पुणो : पुणोकर नागरिक कृती समितीचे शिष्टमंडळ येत्या 1 डिसेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असून, रुपी बॅँकेचे गा:हाणो मांडणार आहे. बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी दिली.
रुपी बँकेत सात लाख ठेवीदार-खातेदारांचे पैसे अडकले असून, यातील बहुतांश खातेदार हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. तसेच, अंध मुलांसाठी काम करणा:या संस्था व अनाथ आश्रमाचे पैसेदेखील यात अडकले आहेत. गोरगरिबांचे पैसे परत मिळावेत, यासाठी आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रुपी बँकेच्या राज्यभरात 34 शाखा असून, ही शंभर वर्षे जुनी बँक आहे. बँकेचे सात लाख ठेवीदार, खातेदार असून, 5क् हजार सभासद आहेत. तर, बँकेत 1 हजार कर्मचारी काम करीत आहेत. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) र्निबध घातल्याने ठेवीदार-खातेदारांचे कोटय़वधी रुपये अडकून पडले आहेत. अनेक खातेदारांना मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी अडचणी निर्माण झाल्या असून, कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठीदेखील हक्काचा पैसा वापरता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांची आयुष्याची पुंजीदेखील येथे अडकली
आहे. (प्रतिनिधी)
माजी संचालक देव यांच्या घरासमोर आज आंदोलन
4रुपी बँकेचे माजी संचालक ग. ह. देव यांच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील घरासमोर पुणोकर नागरिक कृती समितीतर्फे शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खातेदार-ठेवीदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.