शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रुपी खातेदारांचा रिझर्व्ह बँकेवर ‘संताप’; ८ फेब्रुवारीला आरबीआयवर काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 16:30 IST

रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे विलिणीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयावर खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा

पुणे : रुपी बँकेवर निर्बंध येऊन पाच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही खातेदारांना दिलासा देणारा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्रीय पातळीवरील नेत्यांना रुपी बँक प्रशासन आणि खातेदारांच्या वतीने वेळोवेळी परिस्थिती समजावून सांगण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणताच सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे विलिणीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील तीन मोठ्या सहकारी बँकांनी रुपीचे विलिनीकरण करुन घेण्याची तयारी दर्शविली आहे. तशी आरबीआयला दोनदा पत्र दिलेली आहेत. परंतू त्यानंतरही आरबीआयच्या चुकीच्या भूमिकेमुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयावर खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, या मोर्चानंतर रुपीच्या तोट्यात २५ कोटी रुपयांची भर घालणाऱ्या सहकार मंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPuneपुणे