Banks can not deny these notes if they are written on notes of 500 and 2000 rupees - RBI | 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर लिहिले असेल तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत - आरबीआय

नवी दिल्ली : 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर पेनाने लिहिलेले असेल, तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत. त्या नोटा ग्राहकांना बदलून मिळणार नाहीत. मात्र, त्यांच्या व्यक्तीगत बँक खात्यात जमा करता येऊ शकतात, असे आरबीआयच्या अधिका-यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आरबीआयने लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. शिवाय डिजीटल माध्यातून व्यवहार करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी आरबीआयच्या अधिका-यांकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर काही पेनाने लिहिले असेल, तर चलनातून बाद होणार का, असा सवाल केला. तसेच, ज्या बँका अशा नोटा घेणार नाही, त्यांच्याविरोधात कशी तक्रार करावी, यासंबंधी अनेक प्रश्न या मेळाव्यात उपस्थित लोकांनी केला.
आरबीआयच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर जर पेनाने लिहिले असेल, तर त्या नोटा ग्राहकांना बँकेतून बदलून मिळणार नाहीत. मात्र, अशा नोटा ते आपल्या व्यक्तीगत बँक खात्यात जमा करु शकतात. सध्या नवीन नोटा बदलण्यासंबंधी किंवा परत करण्यासंबंधी कोणतीही योजना आणली नाही. त्यामुळे या नोटा खात्यात जमा करु शकतात. तसेच, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर काहीही पेनाने लिलेले असेल, तर त्या नोटा कोणतीही बँक नाकारु शकत नाही.
दरम्यान, या मेळाव्यात आलेल्या लोकांना आम्ही सध्या चलनात आलेल्या नवीन नोटांच्या फीचरबाबत सुद्धा माहिती दिली जात असल्याचे यावेळी आरबीआयच्या अधिका-यांनी सांगितले. 500, 2000 आणि 200 रुपयांच्या नोटांवर 17 फीचर आहे. तर, 50 रुपयांच्या नोटांवर 14 फीचर आहेत, असेही आरबीआयच्या अधिका-यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.