थापे-वारवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली खवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:10+5:302021-02-16T04:12:10+5:30
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली संजय खवले, तर उपसरपंचपदी नीलेश दत्तात्रय जगदाळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय ...

थापे-वारवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली खवले
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली संजय खवले, तर उपसरपंचपदी नीलेश दत्तात्रय जगदाळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नीरज नागोशे यांनी केली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत कुलकर्णी यांनी काम पाहिले .
या वेळी ग्रामपंचायत सदस्य मुक्ता पवार, रुपाली अ. खवले, सुरेखा खवले, सुरेश खवले, शिवाजी गो. खवले उपस्थित होते.
कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने ह्या निवडी संपन्न झाल्या.
सरपंच ,उपसरपंच सत्कारप्रसंगी पोलीस पाटील कल्पेश वाडकर,
पोलीस पाटील सारिका खवले,दत्तत्रय जगदाळे, रोहित खवले, दत्तात्रय वाडकर, पप्पू वाडकर,उत्तम खवले , बाळासाहेब खवले, दादा पवार , दत्तात्रय चोरघे योगेश जगदाळे ,समीर तरवडे, रमेश येवले, भाऊ आंबवले,पोलीस पाटील कल्पेश वाडकर,
पोलीस पाटील सारिका खवले आदींसह थापेवाडी- वारवडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
थापे- वायवडी (ता. पुरंदर) येथे सरपंचपदी रुपाली खवले व उपसरपंचपदी नीलेश जगदाळे यांच्या बिनविरोध निवडप्रसंगी गंगाराम जगदाळे व ग्रामस्थ.