शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रुपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:14 IST

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी फोन करून दिली होती धमकी...

धायरी (पुणे) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा : अहमदनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे (रा. हडपसर, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर सोमवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील ७२ तासात जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन आला होता. त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो नंबर अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब नारायण शिंदे यांचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलीसांनी त्याला मंगळवारी उशिरा ताब्यात घेतले असून आज बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

लोकसेवक म्हणून शासनाने दिलेल्या कर्तव्यात प्रतिबंध....

रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. असे असताना जाणून - बुजून राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर फोन करून त्यांच्या नावे अश्लील शब्द वापरून जिवे मारण्याची धमकी दिली. लोकसेवक म्हणून काम करीत असताना शासनाने दिलेल्या कर्तव्यात प्रतिबंध येण्याच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी दिल्याने भाऊसाहेब शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. तर याअगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन गेले होते.

महिला आयोगाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांना राज्य महिला आयोगाचा दणका दाखवला होता. मंगळवारी (३१ मे) रोजी रुपाली चाकणकर यांचा वाढदिवस होता. तर सोमवारी म्हणजे वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच असा धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ माजली होती. मात्र धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन सिंहगड रस्ता पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरCrime Newsगुन्हेगारी