"चाकणकर बाईचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात आहे. बावळटबाई आहे. काहीही बोलते. महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण करते. एका बाईला बोलावून एका आमदाराविरोधात व्हिडीओ तयार करायला लावला. ती महिला आत्महत्या करायला निघाली होती. परंतु माझ्याकडे आले. त्यानंतर व्हिडीओ डिलीट झाले", असा खळबळजनक आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केला.
माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप केला. त्या महिलेला रुपाली चाकणकरांनी हे करायला लावले असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. एका युट्यूब वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, "माझ्यावर मारहाणीचा आरोप करणारी महिला ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे. ती माझ्या कॉलेजमध्ये होती. मी तिला ओळखते. मी काल डॉक्टर तरुणीच्या घरी गेले होते. पहाटे चार वाजता मी बीडला होते, मग माझा आत्मा पुण्यात आला होता का?", असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.
चाकणकर फेक अकाऊंट तयार करून बदनामी करते
"माधवी खंडाळकर ही महिला २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. तेव्हा रुपाली चाकणकर शहराध्यक्ष होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली ही महिला काम करत होती. चाकणकर बाई फेक अकाऊंट तयार करतात. अनेकांना सोशल मीडियावर टार्गेट करतात. या बाईला चाकणकर यांनीच हे करायला भाग पाडले", असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.
"महिला आयोगाच्या अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा झाल्या आहेत. कामातून सिद्ध करावं. डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा असून तुम्ही पीडितेवर आरोप करता. पीडितेचे चारित्र्य हनन करत आहात. मी अजित पवारांच्या पक्षात आहे म्हणून बोलले नाही. रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याचा विचार करावा", अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
लोक मला म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का?
"मला बीडमध्ये विचारलं, तुमचा पक्ष आमच्या मुलीची बदनामी करत आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का? कोण उत्तर देणार, त्याचे उत्तर चाकणकर यांनी द्यावे. आयोगावर बसला आहात, याचे भान नसेल, तर कर्तव्याचं नाही. आम्ही शिव्या खात आहोत. मी त्यांना सांगितले की, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मत नाही. वरिष्ठ निर्णय घेतली", अशी टीकाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
Web Summary : Rupali Thombare accuses Chakankar of exploiting women, fabricating videos against rivals. She alleges Chakankar framed her friend, demanding her resignation after a suicide attempt.
Web Summary : रूपाली ठोंबरे ने चाकणकर पर महिलाओं का शोषण करने और प्रतिद्वंद्वियों के खिलाफ वीडियो बनाने का आरोप लगाया। उन्होंने चाकणकर पर अपनी दोस्त को फंसाने का आरोप लगाया और आत्महत्या के प्रयास के बाद उनके इस्तीफे की मांग की।