शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Rupali Chakankar: विकृत मनोवृत्ती अन् महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न, चाकणकरांचा राणांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:12 IST

नवनीत राणा केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्यासाठी मदत का मागितली नाही.

पुणे - मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यावरुन वादात अडकलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावती रुग्णालयातील त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोवरुन त्यांच्यावर टिका केली. तसेच, लिलावती रुग्णालय प्रशासनालाही जाब विचारला होता. आता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही नवनीत राणा यांच्यावर टिका केली आहे.  

नवनीत राणा केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्यासाठी मदत का मागितली नाही. जर राज्यासाठी मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती. हे जे काही चाललंय ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आणि विकृत मनोवृत्ती आहे, असे चाकणकर यांनी म्हटलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

राज्यात कसा वाद निर्माण होईल याकडे काहींचं लक्ष आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा या राज्यातील ठाकरे सरकार विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहेत. यासंदर्भात बोलताना चाकणकर म्हणाल्या की, कोरोनाच्या महामारीतून आत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कष्टकऱ्यांचे असे खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत. 

गणेश नाईकांच्या खटल्याप्रकरणी  गणेश नाईकांविरोधात पीडितेने राज्य महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, प्रत्यक्ष भेटून त्यांनी सगळा प्रकारदेखील सांगितला होता. याबाबत राज्य महिला आयोगाने नवी मुंबई आणि नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये कारवाई बाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सत्र न्यायालयात जामीन मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यानंतर देखील पीडितेने महिला आयोगाची भेट घेतली. आत्ता, पोलीस जो काही तपास करत आहेत, त्यावर महिला आयोगाचा लक्ष लागून आहे. निश्चितच तो तपास निःपक्षपाती होणार आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRupali Chakankarरुपाली चाकणकरMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना