पेन्शनसाठी बँकरची वीस वर्षे धावाधाव
By Admin | Updated: December 26, 2016 02:07 IST2016-12-26T02:07:13+5:302016-12-26T02:07:13+5:30
व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी सामान्य नागरिकाला करावा लागणारा संघर्ष सर्वच मान्य करतील. मात्र, बँक आॅफ इंडियाच्या (बीओआय) माजी अध्यक्षाचा आपल्यावरील

पेन्शनसाठी बँकरची वीस वर्षे धावाधाव
पुणे : व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी सामान्य नागरिकाला करावा लागणारा संघर्ष सर्वच मान्य करतील. मात्र, बँक आॅफ इंडियाच्या (बीओआय) माजी अध्यक्षाचा आपल्यावरील अन्यायाच्या निवारणासाठी तब्बल वीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही या अधिकाऱ्याला पेन्शनचा अधिकार अजून देण्यात आलेला नाही.
पुण्यात स्थायिक असलेले गजानन दाहोत्रे यांनी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवा केली असून, ते जानेवारी १९९५मध्ये निवृत्त झाले. बीओआयमधून निवृत्त होताना त्यांच्या हाताखाली तब्बल ४५ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. तेव्हापासून त्यांचा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या पोलादी व्यवस्थेशी पेन्शनसाठी लढा सुरू आहे.
दाहोत्रे यांनी बँक आॅफ इंडियात ८ वर्षे ११ महिने (मार्च १९७७ ते फेब्रुवारी १९८८) अधिकारी वर्गात व त्या नंतर २ वर्षे ११ महिने (फेब्रुवारी १९९२ ते जानेवारी १९९५) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवा बजावली. (प्रतिनिधी)