शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ; पुणे महापालिकेतर्फे विशेष पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:37 IST

विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देउद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष कर वसुली पथकांची केली नियुक्तीगेल्या दहा दिवसांत १५ कोटी ८४ लाख रुपयांचा थकीत कर वसूल

पुणे : शहरामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. सन २०१७-१८साठी तब्बल १ हजार ४०० कोटींचा मिळकत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना आता पर्यंत केवळ ८९१ कोटी ८६ लाखांचा मिळकतकर वसूल झाला आहे. मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष कर वसुली पथकांची नियुक्ती केली आहे. थकीत कर वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांत १५ कोटी ८४ लाख रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला आहे. मार्च अखेर जवळ आल्याने मिळकतकराची अधिकाधिक थकबाकी  वसूल करून पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा करण्यासाठी पालिकेच्या मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मिळकतकर विभागाने यासाठी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली आहे. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम अधिक तीव्र केल्याने दहा दिवसांतच तब्बल १५ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. येत्या काही दिवस ही कारवाई अधिक कडक करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. पालिकेचा थकीत मिळकतकर भरावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक योजना राबविल्या; मात्र त्यानंतरही अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. अंदाजपत्रकात ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय कर आकारणी व कर संकलन विभागाने घेतला आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे