शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 23:33 IST

टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत

मुंबई - केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यात टँकर व ट्रक एकाच जागी बसून होत्या. या घटनेचे पडसाद पेट्रोलपंप चालकांवर होत आहेत. त्यातच, राज्यभरात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र, पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचं पेट्रोल-डिझेल असोसिएशसने स्पष्ट केले आहे.  

टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत. तर, काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे, उद्या २ जानेवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली. त्यात अफवेतून राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केली. तर, पेट्रोल दर कमी होणार असल्याच्या अफवेनेही काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली. मात्र, पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याची संघटनेची कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशननं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकात म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं पॅनिक होऊ नका. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघठना बांधिल आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केलं. 

असोसिएशनचं स्पष्टीकरण

पेट्रोल चालकांच्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यासह सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील केंद्रातून पेट्रोलचे टँकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. कोठेही पेट्रोलची टंचाई नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अकारण जादा पेट्रोल भरुन घेऊ नये.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPuneपुणेStrikeसंप