सत्ताधारी, विरोधकांत असंतोषाची दरी

By Admin | Updated: March 23, 2015 00:52 IST2015-03-23T00:52:08+5:302015-03-23T00:52:08+5:30

उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे या मुद्द्यावरून वाद असल्याने पालिका अधिकारी व इतर पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.

The ruling, the gap between dissent and opposition | सत्ताधारी, विरोधकांत असंतोषाची दरी

सत्ताधारी, विरोधकांत असंतोषाची दरी

बिबवेवाडी : बिबवेवाडी भागातील अण्णा भाऊ साठे सभागृहाच्या पाठीमागील सुमारे २६ गुंठे जागेत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय व क्रीडा संकुलाचे भूमिपूजन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रविवारी झाले. मात्र उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे या मुद्द्यावरून वाद असल्याने पालिका अधिकारी व इतर पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा नसल्याने अनेक वर्षांपासून सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या जागेतूनच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार चालवला जात होता. त्यामुळे पार्किंग, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा, नगरसेवकांना बैठकीसाठी जागा अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रभाग क्रमांक ७१च्या नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेवक सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाची इमारत व क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे, मनीषा चोरबेले, कविता वैरागे, नगरसेवक सुनील कांबळे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, श्रीकांत जगताप, दिनेश धावडे, प्रवीण चोरबेले, मनोज देशपांडे, भारत वैरागे, गणेश मोहिते, गोकुळ शिंदे, विश्वास ननावरे, हरीश परदेशी, मंगेश सप्रे, मंगेश शहाणे, अनिल भन्साळी, यांची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)

बिबवेवाडी झोपडपट्टीसाठी २ कोटी
४या कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पर्वती मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी २ कोटी तसेच दलित वस्ती पुनर्वसन योजनेंतर्गत पुणे शहरासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
जलतरण तलाव उभारणारच
४या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त जलतरण तलाव उभारणारच असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. माजी आयुक्त महेश पाठक यांनी या ठिकाणी जलतरण तलाव करण्यास विरोध केला होता.

अधिकाऱ्यांची
कार्यक्रमाकडे पाठ
४क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन असल्याने पुण्याचे आयुक्त, पालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, महापौर या कार्यक्रमाला असणे अपेक्षित होते. मात्र एकही पालिका अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.

दिनेश धावडे
भाजपाच्या वाटेवर
४भूमिपूजन कार्यक्रमाला सत्ताधारी व अधिकारी यांनी पाठ फिरवली असली तरी मंचावर भाजपाच्या सर्व नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ७२ चे नगरसेवक दिनेश धावडे उपस्थित होते. या मंचावर दिलीप कांबळे व सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीवर टीकादेखील केली. त्यामुळे दिनेश धावडे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
४या संदर्भात दिनेश धावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही शक्यात फेटाळून लावली. भागातील कुठल्याही विकासकामाला विरोध नसून आमंत्रण आल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The ruling, the gap between dissent and opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.