रुद्रगंगा खळाळली
By Admin | Updated: August 7, 2014 23:21 IST2014-08-07T23:21:11+5:302014-08-07T23:21:11+5:30
बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला.

रुद्रगंगा खळाळली
>नारायणपूर : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला. एक एक बंधारा भरल्याबरोबर ग्रामस्थ ‘नाथ साहेबांचे चांगभलं’ असा गजर करू लागले. पाणी पुढे पुढे सरकत असताना ग्रामस्थही नदीकाठावरून पाण्याबरोबर पुढे पुढे सरकत होते. परिंचे परिसरातील पाच बंधारे भरून पाणी पाच वाजता गावच्या शिवारातून पुढे गेले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटली, असे ग्रामस्थांनी मोठय़ा समाधानाने सांगितले.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पडणा:या संततधार पावसामुळे परिंचे परिसरातून वाहणारी रुद्रगंगा नदी खळाळली. रुद्रगंगा विकास मंडळाच्या माध्यमातून परिंचे ग्रामस्थांनी रुद्रगंगा नदीपात्नात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे बंधा:यातून पंचवीस कोटी लिटरपेक्षाही जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिंचे परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाच्या सदस्यांनी दिली.
ग्रामस्थांनी उभारलेल्या बंधा:यातील पाण्याचे जलपूजन भय्यूमहाराज यांच्या परिवाराचे पुणो जिल्हा अध्यक्ष गणपत दगडे यांच्या हस्ते व पुरंदरचे तहसीलदार संजय दगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी वीर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, विश्वस्थ मंगेश धुमाळ, सुरेश सोनटक्के, सरपंच गणोश दुधाळ, उपसरपंच मनीषा जाधव, पी. एस. जाधव, प्रा. संभाजी नवले, ग्रामपंचायत सदस्य रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. परिंचे गावातील तरुणांनी एकत्न येऊन रुद्रगंगा विकास मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून रुद्रगंगा नदीपात्नातील वाळूमिश्रित गाळ काढणो पात्नाचे खोलीकरण करणो, सरळीकरण करणो, शिवकालीन बंधा:यांची उंची वाढविणो दिवंगत सहकारी दिलीप जाधव यांच्या स्मरणार्थ बंधारा उभारणो, अशी कामे केली आहेत. ग्रामस्थांनी व देणगीदारांनी दिलेल्या वीस लाख रुपयांच्या देणगीतून परिंचे परिसरात बंधा:यातून पंचवीस कोटी लिटर पाणी साठा झाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य अभियंते अप्पासाहेब घाडगे यांनी दिली.
गुरुवारी सकाळी दहा वाजता जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समीर जाधव, गणपत दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गीतांजली जाधव यांनी सूत्नसंचालन केले (वार्ताहर)
या वेळी बोलताना तहसीलदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. जनशक्ती एकत्न आल्यावर जलशक्ती निर्माण करता येते, हा आदर्श परिंचे ग्रामस्थांनी पाणीटंचाई असलेल्या गावांना घालून दिला आहे, असेही पाटील या वेळी म्हणाले.