श्री कपर्दिकेश्वराला रुद्राभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:14 IST2021-09-08T04:14:11+5:302021-09-08T04:14:11+5:30

ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर येथील जागृत स्वयंभू शिवलिंग, ग्रामदैवत श्रीकपर्दिकेश्वर महादेव मंदिरात उभारण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या उभ्या ...

Rudrabhishek to Sri Kapardikeshwar | श्री कपर्दिकेश्वराला रुद्राभिषेक

श्री कपर्दिकेश्वराला रुद्राभिषेक

ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर येथील जागृत स्वयंभू शिवलिंग, ग्रामदैवत श्रीकपर्दिकेश्वर महादेव मंदिरात उभारण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या उभ्या कृलात्मक पिंडींना रुद्राभिषेक घालण्यात आला, अशी माहिती श्रीकपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल ताबे यांनी दिली. याद्वारे श्रावणी सोमवारची सांगता करण्यात आली.

यावर्षी हा बहुमान ओतूरचे अक्षय कुमार रघुनाथ तांबे, सिद्धार्थ प्रमोद पानसरे यांना देण्यात आला. याचे पौरोहित्य तेलंगणाचे स्वामी पुजारी गोविंदराव डुंबरे, अनिलकाका तांबे, आणि दत्ता शिंदे यांनी केले. यावेळी अध्यक्ष अनिल तांबे, सचिव वसंतराव पानसरे, महेंद्र गांधी पानसरे, रघुनाथराव तांबे, पांडुरंग रांजणे, आत्माराम जाधव, पांडुरंग ढोबळे उपस्थित होते. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलीस पथक तैनात होते. महाप्रसादाचे आयोजन रघुनाथराव तांबे, प्रमोद पानसरे यांनी केले होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Rudrabhishek to Sri Kapardikeshwar