महिलेचे पोलिसांशी असभ्य वर्तन
By Admin | Updated: January 28, 2017 01:50 IST2017-01-28T01:50:23+5:302017-01-28T01:50:23+5:30
रस्त्यामध्ये वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे मोटार उभी करु नका, असे सांगितल्याच्या कारणावरून एका महिलेने पोलिसांना

महिलेचे पोलिसांशी असभ्य वर्तन
पुणे : रस्त्यामध्ये वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे मोटार उभी करु नका, असे सांगितल्याच्या कारणावरून एका महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषा वापरत असभ्य वर्तन केल्याची घटना आंबेगाव बुद्रुकमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित ४५ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार आर. जी. देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने तिची मोटार रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे उभी केली होती. दत्तनगर बीट मार्शलवरील पोलिसांनी त्यांना याबाबत हटकले. त्या वेळी संबंधित महिलेने अर्वाच्च भाषा वापरली, असभ्य वर्तन केले. त्यामुळे महिला पोलिसांमार्फत तिला पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले. तेथेही तिने अपशद्ब वापरले. (प्रतिनिधी)