आरटीओ तपासणीत वाहने नापास
By Admin | Updated: June 25, 2015 03:35 IST2015-06-25T03:35:19+5:302015-06-25T03:35:19+5:30
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ७६ वाहने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) तपासणीत नापास झाल्या आहेत. स्कूल बस, तसेच रिक्षा व व्हॅनसाठी

आरटीओ तपासणीत वाहने नापास
पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ७६ वाहने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) तपासणीत नापास झाल्या आहेत. स्कूल बस, तसेच रिक्षा व व्हॅनसाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरटीओमार्फत मागील आठवडाभरात कारवाई करण्यात आली. यापैकी ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती आरटीओ जितेंद्र पाटील यांनी दिली.
शहरातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी वाहत्ूुक करणाऱ्या वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभाग व परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बससाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये विद्यार्थी वाहतूक परवाना घेणे, शाळांसोबत करार करणे, बसमध्ये महिला सहायक नेमणे, अग्निशमन यंत्र बसविणे, प्रथमोपचार पेटी ठेवणे, प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक न करणे, बसमध्ये संगीत न वाजविणे, बस वेगात न चालविणे, अशी अनेक बंधने घालण्यात आली आहेत.
तसेच रिक्षा व व्हॅनसाठीही नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत स्कूल बस, रिक्षा व व्हॅनचालक बिनदिक्कतपणे विद्यार्थी वाहतूक करीत आहेत.