शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पन्नास लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी 'या' माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 13:40 IST

पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली

पुणे : पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे याच्यासह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरूड येथील एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीवर  २०१८ -  २०२० मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाबाबत फिर्यादी यांनी आल्हाट याच्यासोबत संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाटने डेक्कन पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज करा तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसात पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील अधिकारी यांचेशी ओळखी आहेत मी आतापर्यंत ३२ अधिकारी निलंबित केलेले असल्याचे फिर्यादींना सांगून उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द त्याचे लेटरहेड वर अर्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर आल्हाटने फिर्यादींना घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांचे विरुध्द केलेले अर्ज मागे घेऊन देईल असे म्हणून मी सांगितल्या प्रमाणे वागला नाहीत. तर तुम्हाला पण लटकवुन टाकील, जीवे मारुन टाकील अशी धमकी दिली. तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  दरम्यान, खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आल्हाट याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताPoliceपोलिसArrestअटक