आरएसएसमुक्त भारत हीच सेवा दलाची घोषणा
By Admin | Updated: April 29, 2017 04:16 IST2017-04-29T04:16:03+5:302017-04-29T04:16:03+5:30
देशात फॅसिस्ट विचारांच्या शक्ती हातपाय फैैलावत आहेत. आरएसएससारखी संघटना पडद्याच्या मागे राहून मोदी-शहा या जोडगोळीच्या

आरएसएसमुक्त भारत हीच सेवा दलाची घोषणा
पुणे : देशात फॅसिस्ट विचारांच्या शक्ती हातपाय फैैलावत आहेत. आरएसएससारखी संघटना पडद्याच्या मागे राहून मोदी-शहा या जोडगोळीच्या माध्यमातून देशभरात अविश्वासाचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यामुळे आरएसएसमुक्त भारत हाच यापुढे राष्ट्र सेवा दलाचा मुख्य कार्यक्रम असेल,’ असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी केले.
राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सांप्रदायिकतेच्या विरोधात महत्त्वपूर्ण काम करणारे व भारतातील जनआंदोलनात सहभागी असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश खैरनार यांची एकमताने निवड झाली आहे. यानिमित्त त्यांनी
भविष्यातील वाटचालीविषयी मतप्रदर्शन केले.
बरोबर १०० वर्षांपूर्वी इटली, जर्मनीमध्ये ज्या फॅसिझमचा
उदय झाला होता, त्याचीच
पुनरावृत्ती भारतात आज होत आहे. आरएसएसच्या स्थापनेमागील मूळ प्रेरणा हीच आहे. यानिमित्ताने देशातील सर्व पुरोगामी
समविचारी संस्था संघटनांनी राष्ट्र
सेवा दलाच्या आरएसएसमुक्त मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. खैरनार यांनी केले.
(प्रतिनिधी)