आळेफाटा उपबाजारात कांद्याला २३० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:13+5:302021-07-07T04:14:13+5:30
आळेफाटा उपबाजारात चांगल्या कांद्यास असलेले सरासरी दर टिकून आहेत. मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे कांदा आवक ...

आळेफाटा उपबाजारात कांद्याला २३० रुपये दर
आळेफाटा उपबाजारात चांगल्या कांद्यास असलेले सरासरी दर टिकून आहेत. मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे कांदा आवक वाढली होती. जवळपास सरासरी तीस हजार कांदा गोणी येथे विक्रीस येत होत्या. मात्र, मागील वीस दिवसांपासून कांदा आवक घटली आहे. शुक्रवारी बारा हजार, तर रविवारी साडेसात हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. कांदा दर वाढतील, अशी आजही शेतकरीवर्गाला अपेक्षा आहे. आज मंगळवारी दहा कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
आजच्या लिलावात प्रतवारीप्रमाणे प्रति दहा किलो दर याप्रमाणे एक नंबर गोळा कांदा २०० ते २३० रुपये, दोन नंबर कांदा १६० ते २०० रुपये, तीन नंबर कांदा ८० ते १६० रुपये.