रिपाइंच्या वाडेकरांनी मारला बाण
By Admin | Updated: September 28, 2014 00:21 IST2014-09-28T00:21:41+5:302014-09-28T00:21:41+5:30
कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आज सुमारे 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

रिपाइंच्या वाडेकरांनी मारला बाण
>कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आज सुमारे 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात आज शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष तसेच भारीप बहुजन महासंघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघातून एकूण 23 उमेदरावांचे सुमारे 36 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या परशुराम वाडेकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रमेश बागवे यांनी कॉंग्रेसकडून तर मनसेकडून नगरसेवक अजय तायडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगवान वैराट यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, आज अचानक पक्षाकडून नगरसेविका हिना मोमीन यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. या दोन्ही उमेदवारांनी आज आपले अर्ज भरले तसेच एबी फॉर्मही भरले आहेत. दुपारी तीन पूर्वी आलेल्या उमेदवारांना टोकण देऊन रांगेत थांबविण्यात आले होते. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीचे काम सुमारे चार र्पयत सुरू होते. आज दिवसभरात, परशुराम वाडेकर ( शिवसेना),दिलीप कांबळे ( भाजप) नरेश इंद्रसेन जाधव (राष्ट्रवादी), मोहन लक्ष्मण सोनवणो ( राष्ट्रवादी) रमण घोरपडे (अपक्ष), मिलिंद अहिरे ( बसप), संदीप कांबळे ( अपक्ष), नितीन डुबेकर (बसप), सतिश लांडगे ( अपक्ष), भगवान वैराट (राष्ट्रवादी), विनोद साळवे ( अपक्ष) शैलेंद्र जाधव (अपक्ष)नवनाथ कांबळे ( रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया) लक्ष्मण जावळे (अपक्ष), हिना शफीक मोमीन (राष्ट्रवादी), गंगाधर आंबेडकर ( बहुजन भक्ती पक्ष), गौतम बापू लेखंडे ( अपक्ष) , प्रशांत म्हस्के (अपक्ष)