शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:31 IST

शनिवार पासून डेक्कन एक्सप्रेस व डेक्कन क्वीन धावणार

ठळक मुद्देएलएचबी कोच असलेला हा देशातील पहिला डबा ,यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते, एका डब्यांत 44 सीटची आसन क्षमता. हे सीट 180 डिग्री मध्ये फिरतात.

पुणे: पुणे - मुंबईरेल्वे मार्गावरून एकमेव धावणारी डेक्कन क्वीन आणि एक्सप्रेस शनिवारपासून सुरु होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली सेवा पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रथम डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना घाटातील सौदर्य पाहता येणार आहे.

प्रवाशांना लोणावळा -  खंडाळा येथील निसर्गसौंदर्य, माथेरान टेकडीवरील हिरवळ, सोनगीर टेकडी, दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या  निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेता येणार आहे. मुंबई - गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

डेक्कन एक्सप्रेस शनिवारी सकाळी  7  वाजता मुंबई स्थानकावरून सुटेल. पुण्याला 11 वाजुन 5 मिनिटांनी पोहचेल.  हीच गाडी पुणे स्थानकावरून दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी निघेल. सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला पोहचेल.  डेक्कन क्वीन ही गाडी 25 जून रोजी मुंबई सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटानी निघेल. पुण्याला रात्री 8 वाजून 25 मिनिटाला पोहचेल. 26 जून रोजी पुणे स्थानकावर याची नियमित सेवा सुरू होईल. 

विस्टाडोमची  वैशिष्ट्ये

1.एलएचबी कोच असलेला हा देशातील पहिला डबा ,यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते.2.ताशी 180 किमी वेगाने धावणारा. देशात सध्या हा वेग सर्वाधिक आहे.3.मोठ्या प्रमाणांत काचेच्या खिडक्या व काचेचे छप्पर. त्यामुळे प्रवाशांना बाजूचे सोंदर्य सहज पाहता येणार.4.डब्यांच्या एका बाजूला मोठी मोकळी जागा. प्रवासी येते उभे राहून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.5.एका डब्यांत 44 सीट ची आसन क्षमता. हे सीट 180 डिग्री मध्ये फिरतात.6.संगीत प्रेमींसाठी डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पीकर्स 7.वायफाय ची सुविधा.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वेlonavalaलोणावळाNatureनिसर्ग