शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

गुलाबपाणी अन् चंदनाचा टिळा; 'खळ्ळ खटॅक'वाल्या मनसेचा रंग वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:43 IST

आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. 

पुणे : एका निरोपावर राज्यभरातून आलेले लोक...अनेक महिन्यांनी झालेल्या गाठीभेटी, रंगलेल्या गप्पा आणि सुरुवातीला प्रवेश करताना लावण्यात येणारा चंदनाचा टिळा हे दृश्य कोणत्याही लग्नातले नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिबीरातले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. 

आजच्या शिबीरातले स्वागतही अनोख्या पद्धतीने केले जात होते. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लावण्यात येत होते. शिबीराविषयी माहिती देताना मनसे नेते बाबू वागस्कर यांनी  सांगितले की, 'या शिबीराला साधारण साडेआठशे पदाधिकारी हजर आहेत. पक्षाची भूमिका, 'पक्षवाढ, राजकीय निर्णय आणि संबंधित विषयांवर ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत'.या शिबीराकरिता मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर उपस्थित आहेत. तसेच अमित ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे.

 मनसेचे कार्यकर्ते हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात, प्रसंगी रस्त्यावर उतारायलाही ते कमी करत नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी भर थंडीत हा शीतल गुणधर्म असणारा टिळा लावला जात आहे की काय असेही पदाधिकारी गमतीत म्हणत होते. मनसेचे 'खळ्ळ खट्याक', ';लाव रे तो व्हिडीओ' गाजले होते तसेच हे स्वागतही चर्चेत राहील यात शंका नाही. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरे