धर्मशाळेची खोली पाडली
By Admin | Updated: December 23, 2015 00:05 IST2015-12-23T00:05:12+5:302015-12-23T00:05:12+5:30
भीमाशंकर (ता. खेड) येथे खासगी रस्त्यासाठी धर्मशाळेची एक खोली धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेताच भुईसपाट करण्यात आली

धर्मशाळेची खोली पाडली
चासकमान : भीमाशंकर (ता. खेड) येथे खासगी रस्त्यासाठी धर्मशाळेची एक खोली धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेताच भुईसपाट करण्यात आली.सविस्तर वृत्त असे, की भीमाशंकर देवस्थान समितीच्या मालकीच्या
जुन्या धर्मशाळेची एक खोली खाजगी रस्त्यासाठी पाडण्यात आली असल्याची तक्रार देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे व
रत्नाकर कोडीलकर या दोन विश्वस्तांनी देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. (वार्ताहर)