अंगणवाड्यांना मिळालं छत
By Admin | Updated: December 11, 2015 00:56 IST2015-12-11T00:56:41+5:302015-12-11T00:56:41+5:30
इमारती नसल्याने २ हजार अंगणवाड्यांतील मुले समाजमंदिर, खासगी शाळा, मंदिर, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व इतर ठिकाणी भरत होत्या

अंगणवाड्यांना मिळालं छत
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना : ग्रामसेवकांमध्ये निर्माण झाले नवचैतन्य
भंडारा : मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण झाले नाही. याबाबत लोकमतने मंगळवारला ‘ग्रामसेवकांना आदर्श पुरस्काराचा ठेंगा’ या शिर्षकाचे वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे झोपेत असलेल्या जिल्हा परिषद (पंचायत) प्रशासनाने पुरस्कारासंबंधाची फाईल सीईओंकडे सादर केली आहे.
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांच्या प्रशासकीय कामाचा आढावा घेऊन त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करावे असा शासन निर्णय आहे. मात्र भंडारा जिल्हा परिषदेने सन २०१२-१३ पासून आजतागायत एकाही वर्षाचे पुरस्कार वितरण केले नाही. यापूर्वी ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक म्हणून केवळ कागदोपत्री कळविण्यात आले. मात्र त्यांचा कुठेही सन्मान करण्यात आला नाही. यामुळे ग्रामीण जनतेशी निगडीत असलेले शासकीय कामे व त्यांचा लाभ नागरिकांना पोहचविताना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मनात शासनाप्रती उदासीनता निर्माण झाली होती. राज्य शासनाने पुढाकार घेतल्यानंतरही भंडारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामसेवकांना पुरस्कारापासून वंचित ठेवले होते. केवळ कागदोपत्री पुरस्कार देणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेच्या उदासीन धोरणाबाबत मंगळवारच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. (शहर प्रतिनिधी)