ऑनलाईन शिक्षणात मॉडर्न टीचर प्लेअरची भुमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:37+5:302021-07-27T04:12:37+5:30
वाल्हे: शिक्षक वाडीवस्ती वर जाऊन मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करत आहेत पण कोरोना काळात वंचित मुलांना अधिक मार्गदर्शनची ...

ऑनलाईन शिक्षणात मॉडर्न टीचर प्लेअरची भुमिका महत्त्वाची
वाल्हे: शिक्षक वाडीवस्ती वर जाऊन मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करत आहेत पण कोरोना काळात वंचित मुलांना अधिक मार्गदर्शनची गरज आहे. या काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे या करिता मॉडर्न टीचर प्लेअर महत्वाची भूमिका पार पाडेल असे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे यांनी प्रतिपादन केले.
शिवशक्ती धर्मादाय विकास सेवा संस्था यांचे माध्यमातून वाल्हे येथील डोंबारी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाकरिता मॉडर्न टीचर प्लेअरचे वाटप करण्यात आले.
सर्व सामान्य वंचित समूहातील मूल भविष्यामध्ये इतर मुलांच्या तुलनेमध्ये शैक्षणिक दृष्ट्या स्पर्धेत टिकावी या करिता सर्व मुलांना शिक्षणाची समान संधी निर्माण करणे गरजेचे आहे असले बाबत मत शिवशक्ती धर्मादाय सामाजिक विकास सेवा संस्था व शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केले.
मॉडर्न टीचर प्लेअर मध्ये इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत सर्व अभ्यासक्रम त्यामध्ये लोड करण्यात आला आहे. त्यामुळे मुले आनंदाने शिक्षकांच्या विना अभ्यास करण्याकरिता बसू शकतात या बाबत पालकांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रम करिता माजी सरपंच सविता बरकडे, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, पिसुर्टीचे उपसरपंच सुखदेव बरकडे, सरपंच संजय चोरमले, विठ्ठल बरकडे, नवनाथ चोरमले, प्रदीप बरकडे, बाबू मदने, संतोष गायकवाड, सतीश काळे, दीपक बरकडे शिक्षक पद्मा माळवतकर,लालासो खुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन दुर्गाडे यांनी केले तर शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचार यांनी आभार मानले.