शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:46 IST

विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता‘प्रतिभासंगम’ या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे रंगले कथाकथन

पुणे : ‘साहित्यिकाच्या मनात हट्ट, जिद्द, ठाम भूमिका आणि आत्मविश्वास असायला हवा. साहित्याचा जो दिवा, जी मशाल मनात साहित्य संमेलनामुळे लागलेली आहे, ती तशीच धगधगत राहायला हवी. विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित ‘प्रतिभासंगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता झाली. समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व कलाकार योगेश सोमण, स्वागत समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत साठे, अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष शरद गोस्वामी व राघवेंद्र रिसालदार उपस्थित होते.  या वेळी विद्यार्थी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. शरद गोस्वामी यांनी आभार मानले. पुण्यनगरीतील कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरीतील या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.

मिरासदार यांचे कथाकथन रंगलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभासंगम’ या विद्यार्थी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन रंगले. त्यांनी जीवनातील विविध अनुभव सादर करून विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. मिरासदार यांनी प्रवासवर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ या प्रवासकथेचे वर्णन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.  या वेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ दिले. 

टॅग्स :Puneपुणे