शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | तळेगाव ढमढेरेत दरोडासदृश घटनेने खळबळ; सोनार दाम्पत्याला दुकानात मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 21:33 IST

दरोडासदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण...

शिक्रापूर (पुणे) : तळेगाव ढमढेरे येथील मुख्य बाजारपेठेतील एका सोनाराच्या दुकानात दाम्पत्य दुकान बंद करत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक एका युवकाने दुकानात घुसून दाम्पत्याला हत्यारासारख्या वस्तूने मारहाण केल्याने खळबळ उडाली असून, दरोडासदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळेगाव ढमढेरे येथील महेंद्र शहा यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महेंद्र जयंतीलाल शहा व सरिताबेन महेंद्र शहा हे दोघेजण दुकान बंद करत असताना अचानक एक युवक दुकानामध्ये आला व त्याने शहा दाम्पत्याला कोणत्यातरी हत्यारसदृश वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी आरडाओरडा केला, याचवेळी शेजारी नागरिकांनीही आरडाओरडा सुरू केल्याने युवक दुकानातील मागील दरवाज्याने पळून गेला. या घटनेत सरिताबेन शहा या किरकोळ जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकर, पोलिस हवलदार किशोर तेलंग, संदीप कारंडे, आत्माराम तळोले, भरत कोळी, पोलिस नाईक जयदीप देवकर, संतोष शिंदे, विकास पाटील, अंबादास थोरे, रोहिदास पारखे यांसह आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अचानक घडलेल्या प्रकाराने आणि पोलिसांचा ताफा बाजारपेठेत हजर झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र सर्व तपासानंतर याबाबतचा प्रकार समोर येईल, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

बाजाराच्या दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ

तळेगाव ढमढेरे येथे सोमवारी आठवडे बाजार असतो आणि ऐन बाजाराच्या दिवशीच बाजारपेठेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी