चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाची लूट
By Admin | Updated: November 26, 2014 00:03 IST2014-11-26T00:03:50+5:302014-11-26T00:03:50+5:30
पुणो स्टेशन येथील ल मेरिडीयन हॉटेलजवळून चाललेल्या गृहस्थाला चाकूचा धाक दाखवून 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकाला अटक केली.

चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाची लूट
पुणो : पुणो स्टेशन येथील ल मेरिडीयन हॉटेलजवळून चाललेल्या गृहस्थाला चाकूचा धाक दाखवून 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी एकाला अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 27 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली.
स्वपिAल सुरेंद्र गायकवाड (वय 22, रा. गाडीतळ हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप कुमार सरकार (वय 41, रा. पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय राजेश नाईक (वय 2क्, रा. घोरपडे पेठ) याला यापूर्वी अटक केली होते.
ही घटना 2 मे 2क्13 रोजी घडली होती. फिर्यादी हे ल मेरिडीयन हॉटेलजवळून चाललेले असताना तीन जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील यामध्ये चोरटय़ांनी सोन्या-चांदीच्या अंगठय़ा, रोख, ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाईल, क्रेडिट-डेबिट कार्ड व कोरे धनादेश लुबाडून नेले. आरोपींनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील सुचित्र नरोटे यांनी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)