दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST2021-03-30T04:09:41+5:302021-03-30T04:09:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कॅम्प भागातील सेंट्रल स्ट्रीटवरी एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांनी ...

Robbery gang arrested | दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कॅम्प भागातील सेंट्रल स्ट्रीटवरी एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांनी पकडले़ त्यात एका महिलेचा समावेश आहे.

दीपेंद्र रोदे विश्वकर्मा (वय २०), बिक्रम खगेद्र विश्वकमाृ (वय २३), ममता बालाजी राजपूत (वय ३९, सर्व रा. शंकरशेठ रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार संभाजी दराडे यांनी फिर्याद दिली आहे. सेंट्रल स्ट्रीटवर काही जण संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटे ३ वाजता मिळाली. त्यांनी गस्तीवरील लष्कर पोलिसांच्या पथकाला ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले असताना त्यांना पाच जण संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे मिळाली. चौकशी केली असता ते सर्व जण तेथील एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने आल्याची कबुली दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर करीत आहेत.

Web Title: Robbery gang arrested