दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:02+5:302020-12-16T04:29:02+5:30

प्रमोद शांताराम नाडे (वय २१), सुमित जालिंदर शेलार (वय २१), ओंकार हरिभाऊ जाधव (वय २०), सौरभ सुनील पायगुडे (वय ...

Robbery gang arrested | दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

प्रमोद शांताराम नाडे (वय २१), सुमित जालिंदर शेलार (वय २१), ओंकार हरिभाऊ जाधव (वय २०), सौरभ सुनील पायगुडे (वय २८), लोकेश लालचंद पगारे (वय २० सर्व रा. अप्पर इंदिरानगर) आणि आकाश बाजीराव खोपडे (वय २०, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयते, मिरचीपूड, कटावणी, ३ दुचाकी, ६ मोबाईल असा १ लाख ५७ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुखसागरनगर येथील एका कारखान्याजवळ काही जण एकत्र थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चारही बाजूने त्यांना वेढा घालून पकडले. सुखसागर येथील एका मेटलच्या कारखान्यावर ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

Web Title: Robbery gang arrested