शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात दानपेटीची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:48 IST

पुण्याच्या गणेशोत्सव साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव रस्त्यावरील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात चोरीची घटना घडली आहे.

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सव साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव रस्त्यावरील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरातचोरीची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी दानपेटीच लंपास केली आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

बाजीराव रस्त्यावरील नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लंपास केली.  सकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. तेथे असलेले  सीसीटीव्ही तपासले असता, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडले. मंदीरात जाऊन दानपेटी उचलून बाहेर आणली. त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. या दानपेटीमध्ये साधारणपणे १० हजार रुपयांची रोकड असावीयाप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

गेल्या एका वर्षापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. श्रावण महिना सुरू झाला की ही दानपेटी उघडली जाते,  त्यात जमा झालेली रक्कम गणेशोत्सवात वापरली जाते, पण यावेळी चोरट्यांनी आम्हाला दानपेटी उघडण्याची संधी दिली नाही, असे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी सांगितले.                                                                                                                                                                  

टॅग्स :theftचोरीTempleमंदिर