शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

कुरुळीमध्ये भरदिवसा बाजारपेठेत दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 9:32 PM

भरदिवसा कुंभार भट्टी येथे एका लग्नघरामध्ये घुसून घरातील सदस्यांवर धारदार हत्याराने वार करुन घरातील ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देलग्नाची गडबड असल्याने घरामध्ये खरेदी झालेली महागड्या वस्तू, पैसे आणि दागिने

कुरुळी : कुरुळी येथे भरदिवसा कुंभार भट्टी येथे एका लग्नघरामध्ये घुसून घरातील सदस्यांवर धारदार हत्याराने वार करुन घरातील ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. ऐश्वर्या बागडे, वैभव बाळासाहेब बागडे, स्वाती बागडे अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बागडे यांच्या कुटुंबातील एैश्वर्याचा ३० एप्रिल रोजी विवाह आहे. या आठवड्यात सलग चार दिवस बँकेला सुट्टी आहे. त्यामुळे बागडे कुटुंबाची लग्नाची लगबग सुरु आहे. गुरुवारी त्यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चडविला. धारदार हत्यारांनी या तिघांवर वार केले. त्यांना जखमी करुन घरातील ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. लग्नाची गडबड असल्याने घरामध्ये खरेदी झालेली होती. महागड्या वस्तू, पैसे आणि दागिने घरामध्ये ठेवलेले होते. चोरट्यांनी घरावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी घरात घुसल्यावर सर्वांना कोयत्याचा व बंदुकीचा धाक दाखवित खाली बसायला सांगितले. त्यांना विरोध करताच घरातील सदस्यांवर हल्ला चढविण्यात आला. जखमींवर चाकणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :KhedखेडCrimeगुन्हाRobberyदरोडाPoliceपोलिस