शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 09:25 IST

D.S.Kulkarni : डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंगलाही ED कडून जप्त करण्यात आला होता.

ठळक मुद्देडीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंगलाही ED कडून जप्त करण्यात आला होता.

पुणे : हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी हे तुरूंगात आहेत. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या डी एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७, रा. मार्बल आर्च सोसायटी, गणेशखिंड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

डी. एस कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी मंदिराच्या जवळ सुमारे ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला सप्तशृंगी हा बंगला २००६ रोजी बांधला आहे. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्टपूर्ण आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बंगलाही सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. तेव्हापासून तो बंदच आहे. चोरीचा हा प्रकार १६ ऑक्टोबर २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे. 

"त्यांच्या कुटुंबावर ईडीने गुन्हा दाखल केला असल्यामुळे तो जप्त केल्याने बंद होता. या बंगल्यामध्ये चोरी झाली असल्याच्या संशयाने फिर्यादी यांनी ईडीचे अधिकारी, पोलीस व पंच यांच्या समक्ष पाहणी केली. बंगल्याचे दरवाजाचे लॉक व सिल कोणीतरी चोरट्याने तोडून बंगल्यामधील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला," असे भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेRobberyचोरी