नियमावलीचा आधार घेत हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST2020-12-29T04:10:43+5:302020-12-29T04:10:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना विषयक नियमावलीचा आधार घेत शहरातील काही प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. बाटलीबंद ...

Robbery of customers by hotel operators based on regulations | नियमावलीचा आधार घेत हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट

नियमावलीचा आधार घेत हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना विषयक नियमावलीचा आधार घेत शहरातील काही प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. बाटलीबंद पाण्याची सक्ती ग्राहकांना केली जात असून सुरक्षित अंतर ठेवायचे या नियमामाला मात्र सोयिस्कर हरताळ फासला जात आहे.

फर्ग्यूसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या ठिकाणच्या काही प्रसिद्ध हॉटेल्समध्ये असा प्रकार होत आहे. ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमधून पाणी देण्याचे या हॉटेलचालकांनी बंदच केले आहे. त्याऐवजी १० रूपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी ग्राहकासमोर ठेवले जाते. त्याची काहीच माहिती नसल्याने अनेकजण ते पाणी पितात व नंतर त्याची किंमत बिलात लावली जाते. चहा प्यायला तरीही त्याबरोबर पाणीही विकतच घ्यायला लागते.

या बाटलीत फक्त अर्धा लिटर पाणी असते. तेही थंड दिले जात नाही. खाण्यासाठी काही मागवले तर एकापेक्षा जास्त बाटल्या लागतात. प्रत्येक बाटलीसाठी १० रूपये आकारले जातात. ते थेट बिलातच दिसतात. वेटर्सकडून ग्राहकांना पाणी विकत आहे वगैरे पुर्वकल्पना दिली जात नाही. कोणी विचारणा केली तर केंद्र व राज्य सरकारने कोरोनापासून बचावासाठी काही नियम लागू केले आहे. त्यात हॉटेलमध्ये सुटे पाणी, ग्लास ठेवले जाणार नाहीत असे ठळकपणे लिहिलेले आहे असे वेटरकडून सांगण्यात येते.

केंद्र व राज्य सरकारच्या याच नियमावलीत ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असाही नियम आहे. त्याकडे मात्र बाटलीबंद पाण्याची सक्ती करणाºया हॉटेल व्यावसायिकांकडून या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्राहकांची गर्दी असल्यामुळे प्रत्येक टेबल वापरले जाते. हॉटेलच्या मागील, पुढील एरवी मोकळ्या असलेल भागातही टेबल टाकून संख्या वाढवलेली आहे. फर्ग्यूसन रस्त्यावरच्या काही व्यावसायिकांकडून मात्र सुरक्षित अंतर या नियमाचे काटेकोर पालन करत त्याशिवाय ग्राहक आल्यानंतर प्रत्येक वेळी खुर्ची सॅनिटायझरने स्वच्छही करून घेतली जात आहे. या हॉटेलमध्ये पाणी बंद बाटलीतच आहे, पण ते विनामुल्य आहे.

Web Title: Robbery of customers by hotel operators based on regulations