कंपनीवरचा दरोडा फसला

By Admin | Updated: September 15, 2014 05:19 IST2014-09-15T05:19:54+5:302014-09-15T05:19:54+5:30

चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर रविवारी सकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने चाकण पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले

The robbery of the company is unsuccessful | कंपनीवरचा दरोडा फसला

कंपनीवरचा दरोडा फसला

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर रविवारी सकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने चाकण पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. त्यांच्याकडून कटावणी, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्रे जप्त केली आहेत.
रेहान हसन सय्यद (१९ , रा. महाजन आळी, जुन्नर), स्वप्निल पंढरीनाथ केदार (२०, रा.धालेवाडी, जुन्नर), नवराज सय्यद (२२, रा. बाराव, ता.जुन्नर), अमोल दिगंबर बांगर (२०, रा.पिंपळगाव सिद्धनाथ, ता.जुन्नर) व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या पाच चोरट्यांची नावे आहेत.
पोलीस शिपाई सुनील सोपानराव नरके (वय ४३ वर्षे, रा.चाकण) यांनी या घटनेची खबर चाकण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आंबेठाण (ता.खेड) गावाच्या हद्दीत अवजड वाहनांचे सुटे भाग तयार करणारी महिंद्रा फोर्जिंग ही कंपनी आहे. या कंपनीवर हे चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याची कुणकुण पोलिसांना लागली असता, त्यांनी आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम मुंडे, पोलीस शिपाई सुनील नरके, पोलीस हवालदार अय्याज शेख, अनिल ढेकणे, अनंता शिंदे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सापळा लावला. चोरटे कंपनीत घुसून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे
बोलू लागले. त्यांच्याजवळील १९ इंच लांब असलेली काळ्या रंगाची लोखंडी कटावणी, कोयता, चॉपर, लोखंडी पक्कड, लाल रंगाची मोटारसायकल आदी साहित्य हस्तगत केले. (वार्ताहर)

Web Title: The robbery of the company is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.