चोरट्यांनी मारहाण करून लुटले
By Admin | Updated: January 16, 2015 23:59 IST2015-01-16T23:59:49+5:302015-01-16T23:59:49+5:30
रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण करून सुमारे ७0 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मलठण येथील गुरववस्तीत संतोष गायकवाड यांच्या घरात घडली

चोरट्यांनी मारहाण करून लुटले
शिरूर : रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण करून सुमारे ७0 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मलठण येथील गुरववस्तीत संतोष गायकवाड यांच्या घरात घडली. काठीने मारहाण केल्याने गायकवाड यांच्या कुटुंबातील चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की आज (१६ जानेवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय झोपेत असताना घराच्या सेप्टी डोअरचा आवाज आला. संशय आल्याने संतोष यांनी शेजारी राहत असलेला त्यांचा भाऊ भानुदास यास मोबाईलवरून फोन करून बाहेर कोण आहे हे पाहण्यास सांगितले असता, त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून कोणीतरी बंद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संतोष याने दरवाजा उघडल्याने २0 ते ३0 वयाच्या चौघा चोरट्यांनी दरवाजा उघडताच काठीने मारहाण केली. त्यांच्याजवळ लोखंडी कटावणीही होती. संतोष घाबरून रस्त्याकडे पळाले व आरडाओरड केली. आजूबाजूच्या लोकांना जागे करून संतोष घराकडे परत आले असता चौघे चोरटे पळून गेले. त्यांनी संतोष यांची मुलगी प्रणाली (११), पत्नी माया यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. मुलीच्या कानातील ओरबाडून काढल्याने तिच्या कानाला जखम झाली आहे. भाऊ भानुदास यांनाही मारहाण केली. घरातील १ हजार रोख रखमेसह चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, १ हजाराचे चांदीचे दागिने
असा सुमारे ६९ हजार ७५0 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरटे मराठी भाषेत बोलत होते. त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशनला कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)