शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसाकडून तरुणाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 02:56 IST

एकाला अटक : पाषाण टेकडीवर गेला होता फिरायला

पुणे : पोलीस असल्याचे सांगत पाषाण टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जातो, असे सांगून लुबाडणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे़

राहुल सर्जेराव पवार (वय २६, रा़ शिवतेजनगर, हिंजवडी) असे त्याचे नाव आहे़ ही घटना सुसखिंडीजवळील पाषाण टेकडीवर शनिवारी रात्री साडेसात वाजता घडली़ याप्रकरणी एका २५ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे़ हा तरुण आपल्या मैत्रिणीसमवेत पाषाण टेकडीवर फिरायला गेला होता़ या वेळी राहुल पवार याने त्यांना या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी हाफ मर्डर झाला आहे़ मी पोलीस आहे़ या ठिकाणी मुला- मुलींना फिरायला बंद आहे़ तरी देखील तुम्ही येथे फिरता, आता मी तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो, अशी धमकी दिली़ त्यानंतर त्याने तरुणाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली़ व त्यांच्याकडील ५०० रुपये जबरदस्तीने लुटून नेले़ याची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पवार याला अटक केली आहे़ दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका तरुणाला दोघांनी जबरदस्तीने लुबाडले होते़महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६ लाखांना गंडापुणे : मुलाला महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका महिलेला ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी वडगाव बुद्रक येथील ५८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ ही घटना १८ मार्चपासून आतापर्यंत वडगाव बुद्रक येथे घडली. या महिलेला दोघांनी विश्वास संपादन करुन महापालिकेत त्यांच्या मुलांना क्लार्कपदावर नोकरी लावतो, असे सांगितले़ त्यासाठी त्यांच्याकडून ६ लाख रुपये १८ मार्च रोजी घेतले़ त्यानंतर नोकरीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ३२ लाखांची फसवणूकपुणे : रो-हाऊस बांधून देण्याच्या नावाखाली एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ३२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़बाबाजी बाबूराव जाधव (रा़ सद्गुरु बंगला, धनकवडी) असे त्यांचे नाव आहे़ याप्रकरणी प्रकाश मॅमन जार्ज (वय ६३, रा़ घाटकोपर) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार ८ जानेवारी २०११ पासून घडला आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश जॉर्ज हे मुंबई येथून सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत़ जाधव यांनी त्यांना कात्रज येथील गायत्री बिल्ंिडग येथे रो हाऊस बांधून देतो, असे सांगितले होते़ त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३२ लाख रुपये घेतले़ मात्र, गेल्या ८ वर्षात रो-हाऊस बांधून दिला नाही़ जार्ज यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे़ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस