गुंगीचे औषध देऊन लुटले
By Admin | Updated: January 28, 2017 01:49 IST2017-01-28T01:49:51+5:302017-01-28T01:49:51+5:30
लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने एकाला कॉफीमधून गुंगीचे औषध पाजून लुटण्यात आल्याची घटना स्वारगेट येथील बसस्थानकावर १६ जानेवारी

गुंगीचे औषध देऊन लुटले
पुणे : लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने एकाला कॉफीमधून गुंगीचे औषध पाजून लुटण्यात आल्याची घटना स्वारगेट येथील बसस्थानकावर १६ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळकृष्ण महामुनी (वय ४१, रा. हिंगणे, विठ्ठलवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. महामुनी त्यांचा मित्र सुनील बर्वे यांना सोडण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आले होते. त्यांना सोडून घरी जात असताना अनोळखी व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली. थोड्या अंतरावरच त्यांना आरोपीने कॉफी पाजली. त्यांना चक्कर आली. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तीन हजारांची रोकड आणि सोनसाखळी, दोन अंगठ्या व मोबाईल असा एकूण १ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरून नेला. (प्रतिनिधी)