दुचाकीस्वाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST2020-12-23T04:07:52+5:302020-12-23T04:07:52+5:30

पुणे : दुचाकीस्वाराला मागून आवाज देऊन थांबवत दोन जणांनी त्याच्या डोळ्याला दगडाने इजा करीत लुटले. यातील एकाला भारती विद्यापीठ ...

Robbed the biker | दुचाकीस्वाराला लुटले

दुचाकीस्वाराला लुटले

पुणे : दुचाकीस्वाराला मागून आवाज देऊन थांबवत दोन जणांनी त्याच्या डोळ्याला दगडाने इजा करीत लुटले. यातील एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज डेअरी चौकातील उमेश बिअर शॉपी समोरील एस.टी थांबा येथे २ वाजता ही घटना घडली.

शंकर उर्फ बापू कैलास पन्नेकर (वय २२, रा.ए/१२/१५ बिबवेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी परशुराम मुचडे (वय ४२, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना मागून आवाज देत थांबवले. त्यांच्या जवळ जात उजव्या डोळ्याच्या खाली दगडाने मारून त्यांना जखमी करण्यात आले. त्यांच्या पँटच्या पाठीमागील खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. त्यातील ६०१ रूपयांची रक्कम आणि कागदपत्रे घेऊन ते पसार झाले.

Web Title: Robbed the biker