वेल्ह्यातील रस्त्यामुळे पर्यटनास चालना मिळणार : थोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST2021-04-03T04:10:04+5:302021-04-03T04:10:04+5:30
वेल्हे तालुक्यातील रस्त्यामुळे पर्यटनास चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी साखर येथील आयोजित कार्यक्रमात केले. वेल्हे तालुक्यातील ...

वेल्ह्यातील रस्त्यामुळे पर्यटनास चालना मिळणार : थोपटे
वेल्हे तालुक्यातील रस्त्यामुळे पर्यटनास चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम
थोपटे यांनी साखर येथील आयोजित कार्यक्रमात केले.
वेल्हे तालुक्यातील मार्गासनी ते साखर,साखर ते चिरमोडी,साखर ते वाजेघर रस्त्याचे भूमिपूजन
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते,बोलताना ते पुढे
म्हणाले की वेल्हे तालुक्यात किल्ले राजगड व किल्ले तोरणा,मढेघाट,गुंजवणी धरण आदी पर्यटनस्थळे
आहेत.मार्गासनीवरुन किल्ले राजगडकडे जाण्यासाठी मार्ग आहे.मार्गासनी ते साखर चिरमोडी रस्त्यासाठी
१ कोटी ९६ लाख रुपये तर चिरमोडी ते वाजेघर रस्त्यासाठी २ कोटी ३१ लाख साखर ते वाजेघर रस्त्यासाठी
१ कोटी ९९ लाख निधी मंजूर झाला असून किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी रस्ता होणार आहे.त्यामुळे या रस्त्यावरुन
पर्यटक वाढणार असुन किल्ले राजगडावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे.पर्यटनामुळे रोजगारांची संधी निर्माण
होणार असल्याचे यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सभापती दिनकर सरपाले,जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,दिनकर धरपाळे,उपसभापती अनंता दारवटकर
पंचायत समिती सदस्या सीमा राऊत,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना राऊत,वेल्हयाचे सरपंच संदीप नगिने,मार्गासनीचे माजी सरपंच
विशाल वालगुडे,शिवाजी चोरघे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आशा रेणुसे,भिकोबा रणखाबे,मोहन काटकर,उपसरपंच दत्ता गायकवाड
माजी उपसभापती डॅा.संभाजी मांगडे,साखरच्या उपसरपंच वनिता रेणुसे,शंकर रेणुसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मार्गासनी (ता. वेल्हे) आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मार्गासनी ते साखर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.