वनविभागाच्या हद्दीतील रस्ते रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST2021-03-31T04:10:31+5:302021-03-31T04:10:31+5:30

दौंड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे चालू आहेत व काही ठिकाणी पूर्ण झाली आहे. ज्या ठिकाणी वनविभाग हद्द आहे, ...

Roads blocked within the Forest Department | वनविभागाच्या हद्दीतील रस्ते रखडले

वनविभागाच्या हद्दीतील रस्ते रखडले

दौंड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे चालू आहेत व काही ठिकाणी पूर्ण झाली आहे.

ज्या ठिकाणी वनविभाग हद्द आहे, त्याठिकाणी रस्त्याची कामे बाकी आहे. नवीन झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी ही अशीच परिस्थिती आहे. यामुळे प्रवासीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रखडलेल्या रस्त्यांपैकी अष्टविनायक मार्गावरील चौफुला -सुपा मार्गावरील पडवी घाट ( सुपा घाट),पडवी - कुसेगाव,कुसेगाव- सुपा,पाटस-रोटी -वासुंदे या भागातील रस्ते रखडले आहे तरच तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते रखडले असल्यामुळे या वनविभाग हद्द व पडवी येथील मयूरेश्वर अभयारण्य यांच्या हद्दीतील व तालुक्यातील अन्य ठिकाणी वनविभागाच्या हद्दीतील रखडलेल्या रस्त्याची कामे मार्गी लागणे गरजेचे आहे.

चौफुला-सुपा मार्गावरील पडवी घाट ( सुपा घाट) या ठिकाणच्या रखडलेला रस्ता.

Web Title: Roads blocked within the Forest Department