रोडरोमिओंची उडाली धावपळ

By Admin | Updated: February 3, 2016 00:45 IST2016-02-03T00:45:15+5:302016-02-03T00:45:15+5:30

शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करून मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर चिंचवड पोलिसांनी मंगळवारी सकाळी अचानक कारवाई केली.

RoadRomino flew over | रोडरोमिओंची उडाली धावपळ

रोडरोमिओंची उडाली धावपळ

पिंपरी : शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करून मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर चिंचवड पोलिसांनी मंगळवारी सकाळी अचानक कारवाई केली. अचानक धरपकड कारवाईमुळे टवाळखोरांना पळता भुई थोडी झाली. कारवाईच्या भीतीने टवाळखोरांनी पळ काढला.
चिंचवड पोलीस ठाण्याअंतर्गत पोदार महाविद्यालय, फत्तेचंद जैन विद्यालय, माटे विद्यालय, तसेच महापालिका शाळांच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रोडरोमिओेंचे प्रमाण वाढले होते. हे रोडरोमिओ महाविद्यालयासमोर दुचाकी लावून टोळक्याने उभे राहणे, हॉर्न वाजविणे, मोठ्या-मोठ्या आवाजात गप्पा मारणे, मुलींना पाहून शिटी मारणे, छेडछाड करणे आदी घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच पालकांकडून रोडरोमिओंवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी धरपकड मोहीम राबविली. (प्रतिनिधी)

Web Title: RoadRomino flew over