रस्त्याच्या काम करणाऱ्या कामगाराला रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:43+5:302021-05-28T04:09:43+5:30

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ते जेजुरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पाटील कन्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. कंपनीचे व्हिजिलन्स ऑफिसर सुरेश ...

Road worker beaten by rod | रस्त्याच्या काम करणाऱ्या कामगाराला रॉडने मारहाण

रस्त्याच्या काम करणाऱ्या कामगाराला रॉडने मारहाण

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ते जेजुरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पाटील कन्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. कंपनीचे व्हिजिलन्स ऑफिसर सुरेश उमाप, प्रोजेक्ट मॅनेजर खान व चालक अमोल पोकळे हे अष्टापूर गावचे हद्दीत नदीजवळ रस्त्याचे कामाची देखरेख करण्यासाठी आले असता पोपट कोतवाल व नाना कोतवाल यांनी त्यांना कोणास विचारून काम चालू केले असा वाद घालून लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

माजी सैनिक फिर्यादी सुरेश उमाप यांच्यावर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांची भेट घेऊन संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

Web Title: Road worker beaten by rod