शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

सहा महिने रखडले रस्त्याचे काम , खड्ड्यांतून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:21 IST

डीआयएटी पासून गो-हे गावच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यासाठी निधी असूनही केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट आणि अपूर्ण झाले

खडकवासला : डीआयएटी पासून गो-हे गावच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यासाठी निधी असूनही केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट आणि अपूर्ण झाले असून सहा महिन्यापासून रेंगाळलेल्या या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही. येथील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमधून वाट शोधण्यात वाहन चालकांची दमछाक होत आहे.सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून या रस्त्यासाठी मंजूर होउन एक वर्ष झाले. डीआयएटीच्या गेट पासून ७०० मीटर रस्ता गोºहेच्या पंचशीलनगरपर्यंत येतो. प्रत्यक्षात या कामासाठी जून उजाडला. हे काम करताना खडीकरण पूर्ण रस्त्यावर केले नाही. काही ठिकाणी जुन्या रस्त्यावर कार्पेट केले गेले. सिलकोटचे काम पावसाची सुरवात झाल्यामुळे करताच आले नाही. त्यामुळे अशा निकृष्ट व अपूर्ण झालेल्या कामावर आठवड्यात खड्डे पडले. खड्ड्यांबरोबर उखडलेली खडी रस्त्यावर पसरली. अशा रस्त्यावरून दुचाकी चालवणे म्हणजे जीवावर उदार होऊनच चालवणे. पूर्वीपेक्षाही या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.डीआयएटीपासून लगेच वळण आहे. खड्डे आणि पसरलेल्या खडीवरून वाहन हमखास घसरणार. पुढे ५० मीटरच्या अंतरात एक खड्डा चुकवताना दुसºया खड्ड्यात वाहन हमखास आदळणारच. पुढे अ‍ॅक्वेरिअस आणि कोंढाणा हॉटेलपासून सावली हॉटेलसमोर तर पंचशीलनगरपर्यंत खड्डे, उखडलेला रस्ता आणि पसरलेली खडीमिश्रित वाळू, असे चित्र आहे. अशा रस्त्यावरून वाहनांचे अपघात झाले नाहीत तरच नवल!येथे अनेक मोठे अपघातही झाले आहेत. या रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.गोºहे गावचे सरपंच सचिन पासलकर म्हणाले, उपसरपंच सुशांत खिरीड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे, तालुका प्रमुख नितीन वाघ यांनी कामाचा दर्जा राखून रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन देऊन अनेकदा पाठपुरावा केला, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे आणि सहायक अभियंता नकूल रनसिंग आश्वासनांच्या पुढे गेले नाहीत.डांबर कमी आणि निकृष्ट वापरल्याने दर्जाहिनकाम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यावर पावसामुळे काम खराब झाले आहे, असे म्हणून दर्जाहिन कामाची जबाबदारी टाळण्यात येते. प्रशासनाकडून अशी कामे करणाºया ठेकेदारांना अभय मिळते आणि बिलही लगेच मिळते.- सचिन पासलकर,सरपंच, गोºहे बुद्रुकया कामाची मंजुरी एक वर्षांपूर्वीची असून मे महिन्यात काम सुरु केले गेले. दरम्यान पावसामुळे अर्धवट काम बंद करण्यात आले. संबंधित ठेकेदारास नोटीस देवून काम पहिल्यापासून पूर्ववत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे बील देण्यात आलेले नाही. आठवड्यात काम सुरू करण्यात येणार आहे.- जयंत काकडे,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हवेली.अर्धवट झालेल्या कामामध्ये पावसामुळे खड्डे पडून उखडला आहे. हे काम पूर्ववत आठवड्यात सुरू होणार आहे. दर्जा राखून सुरुवातीपासून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.- भीमराव तापकीर,आमदार, खडकवासलाविधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Potholeखड्डे