कात्रजमधील शेलारमळा येथील रस्त्याचे काॅंक्रिटीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:52+5:302021-02-23T04:16:52+5:30

तसेच सुखसागरनगर भाग क्रमांक १ मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे व रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. गेल्या ...

The road at Shelarmala in Katraj will be concreted | कात्रजमधील शेलारमळा येथील रस्त्याचे काॅंक्रिटीकरण होणार

कात्रजमधील शेलारमळा येथील रस्त्याचे काॅंक्रिटीकरण होणार

तसेच सुखसागरनगर भाग क्रमांक १ मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे व रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कोरानाने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला होता. त्यामुळे सर्वच नियोजित कार्यक्रम रद्द झाली होती. तसेच, अनेक विकासकामांना खीळ बसली होती. परंतु, आता कोरानाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे विकासकामाला पुन्हा गती मिळणार असल्याचा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी राजाभाऊ कदम, दीपक गुजर, प्रकाश गुजर, शिवाजी पवार, किसन निबांळकर, सागर बालवडकर, संतोष माने, प्रकाश सासवडे, भानुदास मराठे, सौदाने, दीपक मोहिते, जितेंद्र ओसवाल, डॉ. मनोहर जाधव, डॉ. रुपाली जाधव, धनेश चौधरी आदींसह प्रभाग क्र. ३८ मधील सर्व पदाधिकारी व स्थानिक नागिरक उपस्थित होते.

Web Title: The road at Shelarmala in Katraj will be concreted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.