शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बनेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग खचला, रस्ता तात्पुरता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 21:06 IST

नसरापूर ( पुणे ) : येथील नसरापूर बाजारपेठेतून बनेश्वर मंदिराकडे (ता. भोर) जाणारा रस्ता आज दुपारी पाच नंतर खचल्याने ताबडतोब प्रशासनाच्यावतीने ...

नसरापूर (पुणे) : येथील नसरापूर बाजारपेठेतून बनेश्वर मंदिराकडे (ता. भोर) जाणारा रस्ता आज दुपारी पाच नंतर खचल्याने ताबडतोब प्रशासनाच्यावतीने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटना स्थळी जाऊन पुढील धोका ओळखून रस्ता वाहतुकीस तात्पुरता बंद केला आहे.

बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता शिवगंगा नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्यामुळे तळातून माती निसटत चालली असावी त्यामुळे रस्ता धोकादायक होण्याची प्राथमिक शक्यता अन् भुस्खलन होण्याची शक्यता यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नसरापूर ग्रामपंचायतीला तोंडी कल्पना दिली असून या धोकादायक रस्त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे या उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता इक्बाल शेख, मंडलाधिकारी प्रदीप जावळे, माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी यशवंत कदम, ज्ञानेश्वर झोरे,संदीप कांबळे,नसरापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण,ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, विजय गयावळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता धोकादायक बनल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून त्याभोवती बांबूचे सुरक्षा कडे उभारण्यात आले आहे. त्यासाठी रस्ता बंद असल्याबाबत सूचना बनेश्र्वर चौकात ग्रामपंचायतीच्या वतीने फलक लावण्यात आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता शिवगंगा नदीच्या पात्रालगत आहे. हा धोकादायक रस्ता नदीपात्रालगत असून नदीपात्रापासून सुमारे दीडशे फूट पेक्षा अधिक उंचीवर आहे. त्यामुळे या मातीच्या धशीच्या डाव्या बाजूस खोल दरी असून रस्त्याच्या उजव्या बाजूस खासगी शेत जमिनी आहेत.या रस्त्यालगत वाहनांना अपघात होऊ नये याकरीता जिल्हा परिषदेकडून संरक्षक भिंत उभारलेली आहे. अनेक वर्षे रस्ता धोकादायक असताना आजतागायत येथू नबनेश्वर, केळवडेकडे जाणारा रस्ता अव्याहतपणे सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड