पुरंदर विमानतळ विरोधासाठी रस्ता अडवला
By Admin | Updated: February 14, 2017 01:51 IST2017-02-14T01:51:03+5:302017-02-14T01:51:03+5:30
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी बाधित गावांतील शेतकऱ्यांनी विमानतळविरोधी संघर्ष समिती सदस्यांच्या

पुरंदर विमानतळ विरोधासाठी रस्ता अडवला
सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी बाधित गावांतील शेतकऱ्यांनी विमानतळविरोधी संघर्ष समिती सदस्यांच्या नेतृत्वाखाली सासवड येथील पीएमटी बस स्थानकासमोरील पुणे-पंढरपूर रस्ता दीड तास रस्ता रोखून धरला.
सासवड पोलीस स्टेशनने त्याच वेळी संघर्ष समितीच्या दत्ता झुरंगे, सर्जेराव मेमाणे, जितेंद्र मेमाणे आणि संतोष हगवणे या प्रमुखांवर गुन्हे दाखल केले होते. विमानतळाला या साऱ्यांचा विरोध आहे़
या पार्श्वभूमीवर आज (१३ फेब्रुवारी) सासवड पोलीस स्टेशन येथे या चार प्रमुखांना अटक करून त्यांची व्यक्तिगत जातमुचलक्यावर
सुटका केल्याची माहिती सासवडचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार
पाटील यांनी दिली.
(वार्ताहर)