शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:36 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

डेहणे - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत आहेत, तर अनेक खासगी तळी भरून ठेवण्यात आली आहेत. चासकमान धरणावर शिरूर व दौंड तालुक्यातील शेती समृद्ध होत असताना ज्या लोकांनी या धरणासाठी जमीन दिली, त्या पश्चिम भागातील गावं मात्र तहानलेली आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीच्या खोलगट भागात (डोह) आणि झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करत आहेत. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकामागोमाग एक आवर्तन चालू असल्याने नदीपात्रातील तळ उघडा पडला आहे. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आवर्तन सोडताना या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी होत होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यापुढे तरी धरणातून पाणी सोडू नये, अशी मागणी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.आदिवासी भागातील गावांमधील पशुधन जगवणे यामुळे कठीण झाले आहे. पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकºयांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावांतील रब्बी हंगाम पाण्या अभावी वाया गेला आहे. दरवर्षी या भागात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पाणी अडवण्याचे नियोजन नसल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.बंधारे कागदावरच....-पश्चिम भागातील आदिवासी भागात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिला असल्याचे अनेक वर्षे सांगितले जात आहे.-हक्काचे पाणी व पाणीटंचाईपासून मुक्तता हवी असेल तर बंधाºयांसाठी जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाºयांना जमीन लागणार नाही, धरणांतर्गत काम होणार असल्याने त्यामुळे कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. बंधारे केल्याचे फायदे मात्र अनेक आहेत. पावसाळा संपला की अवघ्या दोनेक महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते. ठिकठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यांपर्यंत पाणी थोपवले जाऊ शकते.गावे तहानलेलीभीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच, विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निकषात बसत नसल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्या तहानलेल्या असल्याचे या परिसरात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणेwater scarcityपाणी टंचाई