शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चक्रीवादळाचा धोका, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:39 IST

कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. 

 पुणे : कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडु, कर्नाटक किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रावर कयार अतितीव्र चक्रीवादळ आता भारतापासून दूर गेले आहे.  त्याचवेळी अरबी समुद्रात मालदीव परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारी दुपारी ते केरळमधील तिरुअनंतरपुरम पासून २७० किमी दूर होते. गेल्या ६ तासात ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे.सुदैवाने हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.यामुळे लक्ष्यद्वीप बेटांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तसेच पुढील ४८ तासात केरळातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे़ ३१ आॅक्टोबरला कर्नाटक किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ शिरुर घोडनदी १५ मिमी तसेच सांगलीला पाऊस झाला़ बुधवारी दिवसभरात नाशिक ४, परभणी ५, औरंगाबाद ०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुण्यात सायंकाळी काही ठिकाणी पाऊस झाला. इशारा : ३१ आॅक्टोबरला कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी मुसळधार, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ १ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर, गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता़ २ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.   ३१ आॅक्टोबर व १ नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ३१ आॅक्टोबरला पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, साताा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  १ नोव्हेंबरला औरंगाबाद, बीड, लातूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २ नोव्हेंबरला नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र