पेट्रोल, डिझेलबरोबर खाद्यतेलाचे दरवाढीमुळे सामान्यांना जगणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST2021-06-04T04:09:49+5:302021-06-04T04:09:49+5:30
वाल्हे (ता.पुरंदर) येथील एचपी पेट्रोलियमचा खैरेमोड पेट्रोलियम नावाने पेट्रोल पंप असून, बुधवार दि. २ या पेट्रोलपंपावर १०० रुपये ...

पेट्रोल, डिझेलबरोबर खाद्यतेलाचे दरवाढीमुळे सामान्यांना जगणे कठीण
वाल्हे (ता.पुरंदर) येथील एचपी पेट्रोलियमचा खैरेमोड पेट्रोलियम नावाने पेट्रोल पंप असून, बुधवार दि. २ या पेट्रोलपंपावर १०० रुपये ९१ पैसे प्रतिलिटर, डिझेल ९१ रुपये ३४ पैसे ऐवढी उच्चांकी किंमत होती.तर खाद्यतेलाचा भाव तर पेट्रोलपेक्षा कमी होता.मात्र पेट्रोलपेक्षा तेल एवढे वाढले की जगणे कठीण झाले असल्याची भावना सर्व सामान्य नागरिक करीत आहे.संध्या वाल्हे गावात लिटरचा पुडा १४२ रुपये व १५ लिटरचा डबा २२००रुपये एवढा महाग झाला आहे.अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या इंधनदरांवर व खाद्य तेल दर वाढीवर सामान्य नागरिकांमधून केंद्र व राज्यसरकार वर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
वाल्हे परिसरातील बहुतांशी तरुण हे जेजुरी येथील एमआयडीसी मध्ये कामाला जातात. त्यांना मिळणारे साधारण वेतन व वाढणारी महागाई यामध्ये मोठी तफावत असून त्यांना सांसारिक जीवन जगताना कसरत करावी लागत आहे.