पावटा, शेवगा, घेवड्याच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:38+5:302021-06-21T04:08:38+5:30
पुणे : रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याइतकीच आहे. मात्र पावटा, शेवगा आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली आहे, तर इतर ...

पावटा, शेवगा, घेवड्याच्या भावात वाढ
पुणे : रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याइतकीच आहे. मात्र पावटा, शेवगा आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली आहे, तर इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डात ७० ते ८० गाड्यांची आवक झाली.
मध्य प्रदेश येथून ४ ते ५ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ३ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर व गुजरात येथून बटाट्याची २५ ते ३० ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातील आवकेमध्ये सातारी आले १ हजार ते ११०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ४ ते ५ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंगा १५० गोणी, कांदा २५ ते ३० ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव पुढीलप्रमाणे :
कांदा : १५०-२१०, बटाटा : ९०-१५०, लसून : ४००-११००, आले : सातारी १५०-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा: १५०-२००, चवळी : १५०- २००, काकडी : १४०-१८०, कारली हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : ३५०-४५०, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, शेवगा : ५००-६००, गाजर १५०-२००, वालवर ४००-४५०, बीट : १००-१५०, घेवडा : ७००-९००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००- २५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : ३००-४००, भुईमूग शेंगा : २५०-३००, मटार : परराज्य ६००-८००, पावटा : ६००-८००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, नारळ : शेकडा १०००-१६००, मका कणीस : ६०-१००.
------
सर्वच पालेभाज्यांच्या भावात २० टक्क्यांपर्यंत वाढ
पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत मार्केट यार्डात रविवारी सर्वच पालेभाज्यांची आवक घटली. त्यामुळे जवळपास सर्वच पालेभाज्यांच्या भावात १० ते २० दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची दीड लाख, तर मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर दहा ते वीस रुपयांना तर मेथी १५ ते ३० रुपयांनी गड्डीची विक्री होत होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी ) कोथिंबीर : ३०० -१२००, मेथी : १०००-२०००, शेपू : ६००-१०००, कांदापात : १५००-२०००, चाकवत: ५००-६००, करडई: ५००-७००, पुदीना ३००-५००, अंबाडी ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ३००-४००, चुका ५००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ७००-१०००.